Pimpri: स्मार्ट सिटी कक्षासाठी अभियंत्यांच्या नियुक्त्या

एमपीसी न्यूज –  स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या स्मार्ट सिटी सेलवर अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह दोन उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे.

महापालिका माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत जेएनएनयुआरएम, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना तसेच कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी सेल (सीएसआर) सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफीस (सीटीओ) अमृत योजना आदी विविध योजनांचे कामकाज करण्यात येत आहे. तथापि, स्मार्ट सिटी अभियानाचे कामकाज निश्चित वेळेत पूर्ण करणे व कामकाजात गतिमानता येण्याच्या दृष्टीने या कामकाजासाठी 17 नोव्हेंबर 2017  रोजी ‘स्मार्ट सिटी सेल’ची स्थापना करण्यात आली आहे. या सेलचे कामकाज करण्यासाठी अधिकारी, कर्मचा-यांची नेमणूक करणे आवश्यक आहे.

ही बाब लक्षात घेऊन महापालिकेतील स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, उपअभियंता विजय भोजने, हरविंदरसिंग बन्सल, कनिष्ठ अभियंता सुनील पवार, नरेश जाधव यांच्याकडे स्मार्ट सिटी सेलचा तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. या अधिकारी, कर्मचा-यांना त्यांच्याकडे यापूर्वी सोपविलेले सर्व कामकाज सांभाळून स्मार्ट सिटी सेलकडील एरिया बेस डेव्हलपमेंट विषयक कामकाज करायचे आहे. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकारी, कर्मचा-यांच्या कामकाजाचे नियोजन व वाटप करावे लागणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.