Pimpri : स्मार्ट सिटीतील स्वच्छतागृहे ‘अस्वच्छ’!

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी असा गवगवा केला जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri )चिखली परिसरातील स्वच्छतागृहे ‘अस्वच्छ’ आहेत. महापालिकेच्या जनसंवाद सभेत या संदर्भातील मागणी वारंवार करण्यात आली. तरीही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या नैसर्गिक हक्काबांबत महापालिका (Pimpri )उदासीन आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. अनेक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध नाही.

ज्येष्ठ महिलांना बाहेर पडल्यावर त्याचा त्रासदायक अनुभव येतो. याखेरीज, पुरुषांची स्वच्छतागृहे अत्यंत वाईट स्थितीत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक पुरूष आणि महिला यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती ज्येष्ठ नागरिकांनी ‘एमपीसी न्यूज’कडे मांडली. पिंपरी-चिंचवड शहर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखले जाते. परंतु, या शहरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांअभावी ज्येष्ठांची कुंचबणा होत आहे. 12 महिने उलटले; तरी समस्या कायम आहे.

Mulshi : सहयोग फाउंडेशन च्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल व पुस्तके वाटप

शिवानंद चौगुले म्हणाले, ‘‘पेठ क्रमांक 18,महात्मा फुलेनगर ‘फ’ प्रभाग मधील सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यानात स्वच्छतागृह आहे. त्याची अवस्था खूप दयनीय आहे. उद्यानात पुरेसा पाणी उपलब्ध आहे. परंतु, संबंधित कर्मचाऱ्याकडून वेळोवेळी स्वच्छता होत नाही. स्वच्छताअभावी खूप दुर्गंधी येते. नागरिक दुर्गंधी सहन करीत स्वच्छतागृहाचा वापर करतात. तेथील नळ पण चोरीला गेले आहेत. मी ‘फ’ प्रभागाकडे बऱ्याचदा लेखी तक्रारी केल्या.

या तक्रारीला सुमारे 12 महिने उलटून गेले. परंतु, समस्या कायम आहे.’’ स्वच्छतागृह एकतर जॉगिंग ट्रॅकला लागून आहे. सकाळ संध्याकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्यांना या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. त्यांच्या आजूबाजूस खूप घाण असते. त्यामुळे, ज्येष्‍ठांना व नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी उपलब्ध असलेलं स्कॅनर सुद्धा काम करत नाही.”

मधुकर धकाते म्हणाले, सध्या असलेलं स्वच्छतागृह फायबरचं असल्यामुळे नीट स्वच्छ होत नाही. यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्मार्ट टॉयलेटची वेळोवेळी मागणी केली. परंतु अद्याप कार्यवाही झाली नाही. अस्वच्छतेमुळे सगळ्यांनाच एकत्रितपणे सामना करावा लागतो. स्वच्छतागृहांची दुर्गंधी ही सगळ्यांनाच त्रासदायक ठरते आहे. तरी महापालिकेने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.’’

राधाकिसन चौधरी म्हणाले ‘‘बहुतांश ज्येष्ठांना प्रोस्टेटचा किंवा मधुमेहाचा आजार असतो. त्यामुळे, केवळ वारंवार लघुशंकेला जावे लागत नाही तर कधी कधी अतिशय घाईची लागते. स्वच्छतागृह स्वच्छ नसेल तर लघु शंका टाळतात त्यामुळे कपडे ओले होण्याची शक्यता असते. किंवा ज्येष्ठ नागरिकांना ‘युरिन इन्फेक्शन’ होते. त्यामुळे, स्वच्छतागृह असून उपयोग होत नाही. महापालिकेचे आरोग्य खात्याने या विषयात लक्ष घालावे. ही जेष्ठ नागरिकांची मागणी आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.