MPC News Vigil : उद्योगनगरीत पाच दिवसाला होतोय एक खून; अकरा महिन्यात 62 खून

एमपीसी न्यूज – चालू वर्षाच्या जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या (MPC News Vigil)कालावधीत थेट 302 (खून) च्या 62 घटना घडल्या. हे प्रमाण प्रत्येक पाच दिवसाला एक खून एवढे भयानक आहे.

खुनाच्या घटनांची संख्या अधिक असली तरी यातील बहुतांश घटना घरगुती वाद, नात्यातील संशय, प्रेमाचा त्रिशंकू आणि आर्थिक व्यवहारातून झाले आहेत. टोळ्यांमधील गुन्हेगारी पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे शांत झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी अनेक टोळ्यांच्या मुसक्या (MPC News Vigil)आवळल्या आहेत. टोळीयुद्धाचे प्रकार शहरात फार कमी प्रमाणत घडत आहेत. त्यामुळे शहरात शांतता निर्माण झाली आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले.

त्यापूर्वी शहरात बाळू वाघेरे, राकेश भरणे आणि प्रकाश चव्हाण या तीन प्रमुख टोळ्या होत्या. आयुक्तालय सुरु झाल्यानंतर या टोळ्यांमध्ये वाढ झाली सध्या पोलीस रेकॉर्डवर 100 पेक्षा अधिक टोळ्या आहेत. रेकॉर्डवरील टोळ्यांवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे टोळीयुद्धातून होणा-या खुनाच्या घटना नगण्य आहेत.

Mulshi : सहयोग फाउंडेशन च्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल व पुस्तके वाटप

सर्वाधिक खुनाच्या घटनांमागे किरकोळ कारणांवरून होणारे भांडण आणि त्यातून निर्माण होणारी चीढ हे कारण आहे. वैयक्तिक भांडण, एकमेकाकडे रागाने बघितल्यामुळे भांडण होऊन खून करणे. आर्थिक देवाण-घेवाण, दारूच्या नशेत, पूर्ववैमनस्यातून तसेच लैंगिक कारणावरून खून झाले आहेत.

यावर्षीचा पहिला खून 19 जानेवारी रोजी झाला. दारूच्या नशेत मित्राने मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या खुनाच्या घटनेने शहराला हादरवून सोडले. दिल्ली येथे युपीएससी परीक्षेचा अभ्यास करणारा 32 वर्षीय विद्यार्थी विमानाने शहरात आला.

त्याने विमानतळावरून येताना टिकाव खरेदी केला. त्यांनतर दापोडी येथे येऊन त्याने दोघांना खून केला. शिवीगाळ, चारीत्र्यावरील संशय, दारू प्यायला पैसे न दिल्याच्या कारणावरून या वर्षभरात खून झाले आहेत.

जून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक खून झाले आहेत. दाखल झालेल्या खूनाच्या गुन्ह्यांपैकी 59 गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीसांना यश आले आहे. दोन खूनातील आरोपींचा पोलीसांना अद्याप मागमूस लागलेला नाही.

अकरा महिन्यात झालेले खून –
जानेवारी – 3
फेब्रुवारी – 5
मार्च – 6
एप्रिल – 4
मे – 5
जून – 9
जुलै – 2
ऑगस्ट – 5
सप्टेंबर – 2
ऑक्टोबर -10
नोव्हेंबर – 8

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.