Mulshi : सहयोग फाउंडेशन च्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल व पुस्तके वाटप

एमपीसी न्यूज – सहयोग फाउंडेशन यमुनानगर निगडी (Mulshi)यांच्याकडून आदिवासी विद्यार्थ्यांना एकूण दहा सायकल वाटप करण्यात आले. शिवाय, नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचलित, माध्यमिक विद्यालय कोळावडे ता. मुळशी जिल्हा पुणे या विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी 50 पुस्तके भेट देण्यात आले.

यावेळी विविध प्रकारच्या स्पर्धांमधील बक्षीस वितरण( Mulshi )कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महादेव कोंढरे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहयोग फाउंडेशन चे नंदकुमार कुलकर्णी, मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड चे दिनेश कुलकर्णी, प्रकाश साकोरे, आदित्य कुलकर्णी, अशोकराव वाळके पाटील, गिरीश देशमुख, डॉ संजीव संभूत व आनंद पोरे उपस्थित होत.

Bhosari : माजी विरोधी पक्षनेते अमृत पऱ्हाड यांचे निधन

यावेळी मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती माननीय अण्णासाहेब कोंढरे तसेच कोलावडे गावाचे सरपंच अंकुश उभे, दत्ता उभे, सयाजी आढाव ,
प्रभारी सरपंच रुपाली शिंदे उपस्थित होते .

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देशमुख सर, निवेदन काशीद सर, आभार ननवरे सर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी ,पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.