Today’s Horoscope 12 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज- आजचे पंचांग Today’s Horoscope 12 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग-

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 12.12.2023.

शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.

आज विशेष – दर्श अमावास्या.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – अनुराधा 11.57 पर्यंत नंतर ज्येष्ठा.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————–
मेष – ( शुभ रंग – पांढरा)
आज कार्यक्षेत्रात तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. उपासनेने मानसिक बळ वाढेल.

वृषभ ( शुभ रंग- हिरवा)
नोकरी धंदात उत्साही वातावरण राहील. आज महत्त्वाचे व्यावसायिक करार यशस्वी होतील. तुमच्यातील सकारात्मकतेने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम)
मामा मावशी कडून काही महत्त्वाच्या बातम्या येतील. आज काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. आज संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

कर्क – ( शुभ रंग – पिस्ता)
कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकीनऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदाला वेळ देतील.

सिंह -( शुभ रंग – राखाडी)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत कराल. इतरांशी मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

कन्या – ( शुभ रंग- निळा)
आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. आज शेजाऱ्यांशी गोडी गुलाबी राहील. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल, पण तसे करू नका.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)
धंद्यातील येणी वसूल होतील. तुमचा आज कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना योग्य वाव मिळेल. उत्तम दिवस आहे.

वृश्चिक ( शुभ रंग – मरून)
एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधल्यास सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरा मोठ्यांच्या होला हो करा, वाद वाढवू नका.

धनु (शुभ रंग- आकाशी)
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गाला विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजळा मागे धावावेसे वाटेल.

मकर- ( शुभ रंग – डाळिंबी)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.

कुंभ – (शुभ रंग- गुलाबी)
व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. नोकरदारांना वरिष्ठांच्या दडपणात काम करावे लागेल. वैवाहिक जीवनात थोडे लाडीक रुसवे फुगवे असतील.

मीन ( शुभ रंग- भगवा)
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरदारांना अधिकाऱ्यांचे मूड सांभाळावे लागतील. घरात थोरांच्या वयाचा मान राखून वाद टाळावे लागतील. दैव साथ देईल.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.