Alandi : प्रथम समाधी संजीवन पुरस्कार डॉ. विवेक सावंत यांना प्रदान

एमपीसी न्यूज – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समधी सोहळ्याचे (Alandi )औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्यातर्फे यंदापासून देण्यात येणारा पहिला समाधी संजीवन पुरस्कार महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे(एम के सी एल,पुणे) कार्यकारी संचालक डॉ. विवेक सावंत यांना प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह, मानपत्र आणि दोन लाख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Pune : ओशो आश्रमाची जागा बजाज यांना विकण्यास मनाई

अध्यक्षस्थानी प्रभारी जिल्हा न्यायाधीश के. पी. नांदेडकर (Alandi )कमिटीचे विश्वस्त अ‍ॅड विकास ढगे-पाटील, योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश बागडे यांनी केले.

अ‍ॅड विकास ढगे यांनी पुरस्काराबाबतची माहिती दिली.समारोपीय भाषण न्यायाधीश के पी नांदेडकर यांनी केले. आभार प्रदर्शन विश्वस्त राजेंद्र उमाप यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.