PCMC : स्मार्ट सिटीत बाल मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

गेल्या पाच वर्षांत 0 ते 5 वयोगटातील 2 हजार 161 बालकांचा मृत्यू

एमपीसी न्यूज  – स्मार्ट सिटीपासून ते मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात बालमृत्यूचा धक्कादायक (PCMC) आकडा समोर आला असून 2018 ते 2022 अखेर औद्योगिकनगरीत 0 ते 5 वयोगटातील 2 हजार 161 बालकांचा मृत्यू झाला आहे. गर्भवती महिला आणि प्रसुती दरम्यानाचे माता मृत्यूचे प्रमाण नगण्य असले तरी त्यानंतर होणारे मुलांचे मृत्यू मात्र चिंतेची बाब आहे.

Maval : उंबरवाडीतील कातकरी बांधवांना मिळाले घरपोच जातीचे दाखले 

शहरात महापालिकेची शहरात 10 रुग्णालये आहेत. त्यामध्ये 700 खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (PCMC) जिजामाता रूग्णालय, थेरगाव रूग्णालय, आकुर्डी आणि भोसरी अशी मोठी रूग्णालये आहेत. याशिवाय आठ प्रसुतीगृहे, 28 दवाखाने, झोपडपट्ट्यांमध्ये 20 आरोग्य केंद्र आहेत. 8 कुटुंब नियोजन केंद्र, 38 लसीकरण केंद्र आहेत.

यामार्फत रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते. माता बालसंगोपन आणि जन्मजात अर्भके, बालकांसाठी विविध सेवा, सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या आसपास आहे. शहरात 0 ते 5 वयोगटातील 2018 मध्ये 598, 2019 मध्ये 548, 2020 मध्ये 305, 2021 मध्ये 302, 2022 मध्ये 408 तर 2023 चालू आर्थिक वर्षातील सात महिन्यात 283 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

Vadgaon : वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन अ‍ॅक्टिव्ह मोडवर

एकात्मिक बालविकास योजना प्रभावीपणे राबविणे, मातांचे कुपोषण रोखणे, झोपडपट्ट्यांमध्ये कुपोषणाला प्रतिबंध करणाऱ्या आरोग्यविषयक योजना राबवाव्यात. साथरोग व इतर संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण व त्यांच्या फैलावास प्रतिबंध करणे. महापालिकेच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे. राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करणे. कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता बालसंगोपन कार्यक्रम राबवणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणे.

या कारणामुळे होतोय बालकांचा मृत्यू

नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती ही कारणे (PCMC) दिसून येतात. त्याचबरोबर न्यूमोनिया, डायरिया या आजारांनी देखील बालकांचे मृत्यू होतात. काही वेळेला बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवण्याची वेळ येते.

वर्ष महिला प्रसुतींची संख्या बालकांचा मृत्यू
2018-19 28 हजार 258 598
2019-20 32 हजार 728 548
2020-21 27 हजार 273 305
2021-22 30 हजार 136 302
2022-23 33 हजार 508 408
एकूण 1 लाख 51,903 2 हजार 161

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.