Chinchwad : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिम्नास्टीक खेळाचे माहिती सत्र

एमपीसी न्यूज – भारतात 29 आँगस्ट हा राष्ट्रीय क्रिडा दिन (Chinchwad) म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी खेळाचा प्रचार प्रसार करण्याच्या दृष्टीने सर्व क्रिडा प्रेमी कार्यरत असतात.

PCMC : स्मार्ट सिटीत बाल मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

याच ध्येयाने व उद्दिष्टांने हेवन जिम्नास्टीक अकादमी ने जिम्नास्टीक खेळाच्या प्रचारासाठी मोफत जिम्नास्टीक खेळासंदर्भात उद्या (दि.26) सायंकाळी सहा वाजता चिंचवड येथील श्रीधरनगर मधील घारे सृष्टी सभागृह येथे माहिती सत्राचे आयोजन केले आहे.

जिम्नॅस्टिक खेळ काय आहे?  या खेळातील प्रकार काय ? कोणत्या पद्धतीचे खेळाडू जिम्नास्टीक खेळाची निवड करू शकतात ? या व अशा अनेक प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच हर्षद कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहे.

या कार्यक्रमात जिम्नॅस्टिक खेळातली राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आकर्षक असे प्रात्यक्षिक सादर करणार आहे. तरी कार्यक्रम हा मोफत असून जास्तीत जास्त खेळाडू प्रेमी व पालकांनी या सत्राचा लाभ घ्यावा ,असे आवाहन अकादमी प्रशिक्षक प्रमुख अलका तापकीर यांनी आवाहन केले (Chinchwad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.