Talegaon murder : कुऱ्हाडीने घाव घालून बापानेच केला मुलाचा खून

एमपीसी न्यूज – कुऱ्हाडीने घाव घालून बापाने मुलाचा खून केला.(Talegaon murder) मी पोराला मारले म्हणून बाप घराबाहेर आल्यानंतर हा प्रकार उघडकिस आला. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी तीन वाजता बारकरवाडी येथे घडली.

समीर बाळू बोरकर (वय 34, रा. बोरकरवाडी, सुदुंबरे, ता. मावळ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी बाळू बबन बोरकर (वय 55) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समीर याच्या भावाच्या पत्नीने (वय 28) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमर्यादेत 5 लाखांची वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू हा शेती आणि पशुपालन करत होता. मुलगा समीर हा नियमीत काम करत नव्हता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याच्या वागणूकी आणि सवयींमुळे तसेच त्याचे लग्न जमत नसल्याने वडील बाळू आणि समीर यांचा वारंवार वाद होत असे.(Talegaon murder) बाळू यांची थोरली सून फिर्यादी पूनम मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी दिर समीर हा टीव्ही पाहत हॉलमध्ये झोपला होता. बाळू अचानक घरी आले, त्यांनी कुऱ्हाडीच्या उलट्या बाजूने समीरच्या डोक्‍यात मारुन त्याचा खून केला. बाळू रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन ‘मी समीरला मारले’ असे म्हणत बाहेर आल्यानंतर पूनम यांनी हॉलमध्ये जाऊन बघीतले असता समीर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी बाळू याला ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.