Women molestation : नातेवाईकाने केला विवाहितचा विनयभंग

एमपीसी न्यूज – सासरकडील नातेवाईकाने महिलेचा पाठलाग करून त्यांच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार केली आहे.(Women molestation) हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आळंदी येथे घडला.

गणेश देवगुडे (वय 30 रा. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 1) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon murder : कुऱ्हाडीने घाव घालून बापानेच केला मुलाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सासरकडील नातेवाईक आरोपी याने फिर्यादीशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी त्यांचा फोनद्वारे, प्रत्यक्ष पाठलाग केला.(women molestation) फिर्यादींनी त्यास नकार दिला असता त्याने अश्लील शिवीगाळ केली. फिर्यादीच्या पतीला फोन करून फिर्यादीची बदनामी करण्याची तसेच बघून घेण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.