Ramakrishna Hari Krishi Pratishthan: रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्रा. बाळासाहेब लांडगे यांना जाहीर

एमपीसी न्यूज – रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा.बाळासाहेब लांडगे यांना देण्यात येणार आहे.

हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम देवेशचंद्र ठाकूर,अध्यक्ष बिहार विधानपरिषद यांचे हस्ते आणि मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप संत तुकाराम महाराजांची पगडी, उपरणे, गाथा, तुळशीचे रोप, विठ्ठलाची प्रतिमा,मानपत्र आणि 25 हजार रोख असे आहे. पुरस्कार समारंभ मंगळवारी दि. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पुण्यातील पत्रकार भवन येथील एस. एम. जोशी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृतिशील व प्रयोगशील शिक्षणतज्ञ माजी शिक्षण मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नावाने जीवनगौरव आणि कृतज्ञत्ता पुरस्कार दिला जातो.राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, पत्रकारिता, संप्रदाय, या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जन्मदिनी म्हणजे दिनांक 8 नोव्हेंबर या दिवशी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

Chinchwad News: संजय गांधी निराधार योजनेचे चिंचवडमध्ये सर्वाधिक लाभार्थी – शंकर जगताप

या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. बाळासाहेब लांडगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर कृतज्ञत्ता पुरस्कार कुस्ती, सहकार, संप्रदाय, समाजकारण, राजकारण या क्षेत्रात गेली 60 वर्षे सातत्याने महत्वपूर्ण योगदान देणारे गुरुवर्य माजी खासदार आदरणीय विदुरा विठोबा तथानानासाहेब नवले यांना प्रदान करण्यात येणार आहे.तसेच प्रा. रामकृष्ण मोरे यांचे समवेत अनेक वर्षे राजकारण, समाजकारण, शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या माजी मंत्री अनंतराव थोपटे,माजी मंत्री अॅड. मदन शेठ बाफना, आमदार कृष्णराव भेगडे खासदार अशोक आण्णा मोहोळ आमदार अॅड राम कांडगे,आमदार सूर्यकांत पलांडे, आमदार दिलीप ढमढेरे, आमदार अॅड. संभाजीराव कुजीर आमदार जगन्नाथ बापू शेवाळे,यांना देशाच्या स्वातंत्र्यंचे अमृत महोत्सवी वर्षे तसेच प्रा. रामकृष्ण मोरे सरांच्या अमृत महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.