Sangvi theft : बस प्रवासात पावणे तीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – स्वारगेट ते पिंपळे गुरव असा बस प्रवास करत असताना प्रवासात महिलेच्या बॅगमधून पावणे तीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.(Sangvi theft) ही घटना रविवारी (दि. 30) पहाटे घडली.

याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात मंगळवारी (दि. 1) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ramakrishna Hari Krishi Pratishthan: रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्रा. बाळासाहेब लांडगे यांना जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी पहाटे सव्वातीन ते साडेचार वाजताच्या कालावधीत स्वारगेट ते पिंपळे गुरव या मार्गावरून बसमधून प्रवास करीत होत्या.(Sangvi theft) बस प्रवासात त्यांच्या बॅगमधून अज्ञात चोरट्याने पावणे तीन लाखांचे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. फिर्यादी महिला पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ उतरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.