Journalist S M Deshmukh :  ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

शनिवारी अत्रे सभागृहात पत्रकार कार्यशाळा व जीवनगौरव पुरस्कार सन्मान सोहळा

एमपीसी न्यूज – मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पिंपरी – चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडिया परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख (Journalist S M Deshmukh) यांना “जीवनगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार आणि सोशल मीडियाचे सूत्रसंचालक, व्हिडिओ ग्राफर यांना मार्गदर्शन ठरेल अशी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मंगळवारी पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, सोशल मीडियाचे अध्यक्ष सुरज साळवे, ज्येष्ठ सल्लागार अरुण उर्फ नाना कांबळे, बाळासाहेब ढसाळ, संघाचे उपाध्यक्ष प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बानेवार आदी पत्रकार उपस्थित होते.

शनिवारी (दि. 25 जून) पिंपरी, संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाचे पहिल्या सत्रातील कार्यशाळेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Talegaon MIDC Crime News : अज्ञात व्यक्तींनी चोरले महिलेचे सोन्याचे गंठण

तसेच, मुख्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम दुपारी 2.30 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तसेच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे, यांच्या हस्ते एस. एम. देशमुख (Journalist S M Deshmukh) यांना मानपत्र, शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे.

यावेळी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, महिला आघाडीच्या राज्य प्रमुख जानवी पाटील, सचिव संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, पुणे जिल्हा समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया जनार्दन दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भांडवलकर, उपाध्यक्ष सचिन कांकरिया, सूर्यकांत किंद्रे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सदस्य के. डी. गव्हाणे, अनिल भालेराव, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार आदी उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Political Crisis: सातारच्या शिवसैनिकाने गाठले थेट गुवाहाटी, शिंदेंना केलं पक्षात परतण्याचं आवाहन

सकाळी आयोजित केलेल्या पत्रकार कार्यशाळेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे, ज्येष्ठ फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, व्हिडिओ ग्राफर गुरुदास भोंडवे मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा व मुख्य कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क असून पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे विभागातील सर्व क्षेत्रातील पत्रकार बंधू,भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.