Chikhali : चिखलीत कच-याला आग

एमपीसी न्यूज – चिखली येथे साचलेल्या कच-याला आग लागली. ही घटना आज (रविवार) दुपारी साडेपाचच्या सुमारास रिव्हर रेसिडेन्सी जवळ घडली.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेपाचच्या सुमारास चिखली मधील रिव्हर रेसिडेन्सी येथे साचलेल्या कच-याला आग लागली. याबाबत स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाला. काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने आगीमुळे कोणतीही जीवित तसेच वित्त हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.