Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान

केजुबाई घाट थेरगांव  येथे उत्साहात

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई पर्व दुसरे यातील पाचवा आठवडा केजुबाई घाट थेरगांव येथे पार पडला. आज (रविवारी) पाच ट्रक भरून जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली.

मागील वर्षी पहिल्या पर्वात सलग 215 दिवस केलेल्या कामाचा सुयोग्य परिणाम पवना नदीवर दिसत आहे. त्यामुळे आजवर नदीपात्रावर जलपर्णी आलेली नाही. आजच्या स्वच्छता अभियानात प्रमुख पाहुणे म्हणून उप जिल्हाधिकारी डाॅ. यशवंतराव माने, सहाय्यक प्राध्यापक डाॅ. सायली पाटील, जयपूर येथील आर बी आय व्यवस्थापक आर डी कायथ, वक्रतुंड मित्र मंडळ चिंचवडे नगरचे, अॅड. हर्षद नढे, अॅड. महेश टेमगिरे, बरना बोस, शाम मलगी, अभिषेक वाल्हेकर, रविकांत बालवडकर, धनंजय बालवडकर, सचिन खोले, सिकंदर घोडके, देश का सच्चा हिरो चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी, सिद्देश्वर चिले आदी उपस्थित होते. तसेच रो. प्रोजेक्ट डायरेक्टर युवराज वाल्हेकर, फंड रेझिंग डायरेक्टर सचिन काळभोर, रो. आयटी डायरेक्टर गणेश बोरा, खजिनदार वीरेंद्र केळकर, रो सुभाष वाल्हेकर, रो सुधीर मरळ , रो मारूती उत्तेकर, रो सुनिल कवडे, रो जगन्नाथ फडतरे, एस पी वायर्स चे 15 कामगारांची टीम अभियानासाठी उपस्थित होते.

श्रमदानासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिक व पर्यावरण प्रेमींसाठी रोटरी कडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. रो. सोमनाथ हरपुडे यांनी सूत्रसंचलन केले. संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी आभार मानले. रविवारी (दि. 11 नोव्हेंबर) सकळी नऊ वाजता केजुबाई घाट येथे श्रमदानासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन प्रदीप वाल्हेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.