Maval : केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याने गंगा पेपर मिल बंद करण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – बेबडओहोळ येथील कंपनीतून निघणारे ( Maval ) केमिकल युक्त पाणी पवना नदीत सोडल्याने पवना नदीचे प्रदूषण होत आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण कमी न केल्यास गंगा पेपर मिल ही कंपनी बंद करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश वाघोले यांनी याबाबत कंपनी प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. त्यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले उपस्थित होते.

BJP : घर चलो अभियान धुमधडाक्यात राबविण्याचा बुथ कार्यकर्त्यांच्या संमेलनात संकल्प

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या कंपनीचे आपण दूषित पाणी पवना नदीत सोडत आहात वेळोवेळी आपणाला गावकऱ्यांनी सर्वांनी सांगून सुद्धा आपण आपल्या पाण्याची सोय केलेली नाही तुमचे दूषित पाणी नदीच्या पात्रात एकत्रित होऊन तेच पाणी गाव,शेती,जनावरे अनेकांच्या वापरात येते त्यामुळे रोगराई आणि सर्वांनाच ते डोकेदुखीचे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक असून नुकसानीचे व पर्यावरणाला हानिकारक ठरते आहे असे निवेदनात म्हटले आहे.

आपण पाण्याची योग्य ती सोय लवकरात लवकर केली नाही तर युवक काँग्रेसच्या वतीने कंपनीला टाळे लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.लवकरात लवकर कंपनीने पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती देखील निवेदनात केली ( Maval ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.