VadgaonMaval : बाबुराव वायकर यांच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतक-यांना पाच लाखांचा कृतज्ञता निधी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील (वडगाव- खडकाळा गट) पुणे जिल्हा परिषदेचे कार्यसम्राट सदस्य बाबुराव वायकर यांच्या वतीने देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांसाठी पाच लाखांचा कृतज्ञता निधी आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. हा कार्यक्रम पुणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला.

यावेळी मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, सरचिटणीस सुदाम कदम, जिल्हा सरचिटणीस विशाल वहिले, साते ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल मोहिते आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.