Chinchwad : देशात प्रथमच गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धेस सुरुवात

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेत 225  स्पर्धकांचा  सहभाग होता. उद्या रविवारी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. 

 

श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे  सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत  देशाच्या विविध ठिकाणांहून  कानाकोप-यातून स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, यावेळी सचिव बाळकृष्ण खंडागळे, खजिनदार किशोर गुजर, प्रोजेक्ट हेड शंतनू साळवेकर, क्रीडा डायरेक्टर गणेश कुदळे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयूर कलशेट्टी, प्रसाद गणपुले, दीपेन समर्थ, अभिजित तांबे आदी उपस्थित होते.

 

देशात प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, दिल्ली आणि भारताच्या अन्य भागातून सुमारे 225 स्वमग्न व गतिमंद मुले सहभागी होती. सर्व स्पर्धकांची राहण्यासह सर्व सोय आयोजकांकडून करण्यात आली होती.

 

या स्पर्धेचा पारिषोतिक वितरण समारंभ  दुपारी दोन ते चार या वेळेत पारितोषिक वितरण पार पडणार आहे. सर्वसाधारण मुलांचे खेळ पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुडुंब गर्दी झालेली  पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे स्वमग्न व गतिमंद मुलांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.