Pimpri : शहरात प्रथमच स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत एक सप्टेंबरपासून मोफत उद्योजकता शिबिर

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील नवोदित उद्योजकांना नवीन उद्योगाबाबत माहिती देण्यासाठी शंभर दिवसाचे हे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ जास्तीत जास्त तरुणांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते,व भाजपा कार्यकारिणी सदस्य अमित गणपत गोरखे व अ प्रभाग अध्यक्षा  अनुराधा गोरखे यांनी केले आहे. 


अमित गोरखे याबाबत माहिती देताना म्हणाले, एक सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत निगडी येथील नॉव्हेल इन्स्टिटयुटमध्ये गुरुवार व शुक्रवार यादिवशी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत या उद्योजकता शिबिराचा लाभ तरुणांना घेता येणार आहे. हे शिबिर पूर्णपणे मोफत आहे.

याबाबतचा उद्देश सांगताना ते म्हणाले, पंतप्रधानांची योजना तळागाळांपर्यंत पोहोचावी. नवीन उद्योग सुरु करायचा असेल किंवा त्याचा विस्तार कसा मोठा करता येईल याबाबतचे मार्गदर्शन या शिबिरात तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आजच 9119445533 या नंबर वर hi सेंड करा व आपली सीट बुक करा, असे आवाहन गोरखे यांनी केले आहे. तसेच हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.