Shaunagar News : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची माजी नगरसेवक महेश चांदगुडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असताना भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक महेश चांदगुडे यांच्या शाहूनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. उमेश चांदगुडे, महेश चांदगुडे आणि सुप्रिया महेश चांदगुडे यांनी सोमय्या यांचे स्वागत केले.

भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, मुख्य संघटक अमोल थोरात, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कुणाल लांडगे, बापु शिणकर, भगवान मुळे, बाळासाहेब जगताप आणि शाहूनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले होते. शहर दौऱ्यावर असताना सोमय्या यांनी शाहूनगर येथील चांदगुडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. महेश चांदगुडे आणि सुप्रिया महेश चांदगुडे यांनी सोमय्या यांचे पुणेरी पगडी, राधाकृष्ण आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.