Dighi News : दिघी येथे कोयत्यासह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – दिघी पोलिसांनी चौघांना कोयत्यासह अटक केले आहे. (Dighi News) ही कारवाई गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री अडीच वाजता मॅगझीन चौकात करण्यात आली.

सुजल सुंदरराज गावीडन (वय 19 , रा. हडपसर), आकाश वाघमारे, आकाश तानावडे, विकास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मारुती घुगरे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : शहरातील हजारो कष्टकऱ्यांचा नागपूरला धडकला महामोर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घुगरे हे दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. गुरुवारी मध्यरात्री ते दिघी परिसरात गस्त घालत असताना मॅगझीन चौक ते ममता चौक दरम्यान चौघेजण त्यांच्याकडील दुचाकीवरून भरधाव वेगात जाताना आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ कोयते आढळून आले. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.