Nigdi : जुगार अड्ड्यावर छापा; चौघांवर कारवाई

एमपीसी न्यूज – निगडी मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवारी (दि. 8) सायंकाळी सहाच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे करण्यात आली.

रफिक सलीम खान (वय 27), प्रकाश रघुनाथ जोगदंड (26), जेसन जन डिकोना (वय 24) आणि भीमा एंकप्पा धोत्रे (वय 26, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रमिक नगर जुनी चाळ, ओटास्कीम निगडी येथे खुल्या मैदानात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एक हजार 10 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या चौघांवर मुंबई जुगार अॅक्ट कलम 12 (अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.