Alandi : आळंदीमध्ये गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – आळंदी येथे गोविंददेव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती (Alandi) अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत वारकरी शिक्षण संस्थेसमोर याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने तेथील जागेत स्वच्छता,बसण्यासाठी योग्य अशी बैठक व्यवस्था ,मंडप इतर विविध कामे होताना दिसून येत आहे.

 

Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार सामना रंगणार

वारकरी शिक्षण संस्थे जवळ यज्ञ विधीसाठी पुरातन कालीन पर्णकुटीचे काम होताना दिसत आहे. तर आळंदी केळगाव रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात असणारा कचरा यावेळी उचलण्यात आलेला असून तेथील परिसर स्वच्छता केली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभिषेक, वारकरी सत्कार, यज्ञ विधी शुभारंभ, कीर्तन , ग्रंथ शोभा यात्रा, श्रीभागवत कथारंभ, हरिपाठ, श्री भागवत कथा, वेदशास्त्र संवाद, संत पूजन समारोह, कृतज्ञता ज्ञापन पर्व, ज्ञानेश्वरोपासना(इंद्रायणी घाट), मातृशक्ती संम्मेलन, भारत माता आरती, राष्ट्रभक्ती संम्मेलन, भक्तिरस गान, आळंदी क्षेत्र प्रदक्षिणा, मृदुंगनाद, गीता पाठ, महानाट्य, आनंदोत्सव अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान-आळंदी, गाथा मंदिर -देहू, वारकरी शिक्षण संस्था -आळंदी, संत गजानन महाराज संस्थान -आळंदी, श्री भैरवनाथ ग्रामदैवत ट्रस्ट -आळंदी ,श्री नृसिंह सरस्वती स्वामी मठ-आळंदी व समस्त ग्रामस्थ यांचे सहकार्य या कार्यक्रमास (Alandi) लाभत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.