Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार सामना रंगणार

एमपीसी न्यूज – आगामी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati) निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्यात सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. गेल्या 2 दिवसांपासून पार्थ पवार खडकवासला मतदारसंघात कार्यकर्ते, नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.

जागा वाटपात बारामती हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाट्याला येणार आहे. त्या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार आपला उमेदवार देणार असल्याची कुजबुज सुरू आहे. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन दोडके यांचा केवळ 2500 मातांनी भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी पराभव केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची साथ धरावी की अजित पवार यांच्या सोबत जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune : मराठा सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर आदेश

त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. पुरंदर, इंदापूर, बारामती, भोर, खडकवासला या मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांना मानणारा मोठा (Baramati) वर्ग आहे. यापूर्वी सुप्रिया सुळे यांचा विजय सोपा होता. यावेळी मात्र स्वतः अजित पवार विरोधात असल्याने सुळे यांचा विजय कठीण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.