Pune : मराठा सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर आदेश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार( Pune) मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाला मंगळवारी (23 जानेवारी) सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कठोर आदेश दिले आहेत. 

PCMC : महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाला मंगळवारी (23 जानेवारी) सुरुवात झाली. पण, पहिल्या दिवशी सर्वेक्षणात असंख्य अडथळे आले होते. या अडथळ्यांची शर्यत सर्वेक्षणाच्या दुसऱ्या दिवशीही कायम होती.

त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य मागासवर्ग आयोग, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, जिल्हा प्रशासन आदी सर्वेक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणांची तातडीची बैठक घेतली. तसेच सर्वेक्षण वेळेत आणि विना अडथळे सुरू राहण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाला वेग आले आहे. मात्र, तांत्रिक अडचणी जाणवत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुण्यातील सर्वेक्षण वेळेत पूर्ण करायचे असल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी (26, 27 आणि 28 जानेवारी) जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये सुरू राहतील. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला या तीन दिवसांत सुटी घेता येणार नाही. तसेच या तीन दिवसांत सर्वेक्षणाचा बॅकलॉग भरून काढावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ( Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.