PCMC : महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा (PCMC) करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’’ अशी प्रतिज्ञा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, नागरिकांनी आपल्या मताचा योग्यप्रकारे वापर केला तर ते जनतेमधून योग्य प्रतिनिधी निवडून आणू शकतात, आणि त्या माध्यमातून लोकशाही देखील बळकट होऊ शकते. यासाठी शहरातील प्रत्येक मतदाराने निवडणुकांमध्ये निर्भयपणे मतदान करून मतदानाचा महत्वपुर्ण हक्क बजवावा तसेच इतर मतदारांमध्येही याबाबत जगजागृती करावी, असे आवाहनही जांभळे पाटील यांनी केले.

Pune : सॅनिटरी नॅपकिनसह जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटी बद्दल जनजागृतीची आवश्यकता – चंद्रकांत पाटील

यावेळी उप आयुक्त निलेश भदाणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यालय अधिक्षक मिनाक्षी गरूड, उपअभियंता कविता माने, कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधी चारूशिला जोशी, उपलेखापाल गीता धंगेकर, सरीता कुलकर्णी, माया गिते, सुरेखा साळुंके, कॉम्प्युटर ऑपरेटर दिलीप गुंड, मुख्य लिपीक किसन केंगले तसेच विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांच्या निर्देशानूसार 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने 18 वर्षे पुर्ण झालेल्या नवोदित मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. यानंतर 26 जानेवारी 1950 पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. 25 जानेवारी 2011 रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला गेला. तेव्हापासून दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा (PCMC)  केला जातो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.