Lonavla : मला फक्त एक संधी द्या, पाच वर्षांत २५ हजार तरुणांना नोकरी देईन- सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मला फक्त एक संधी द्या, पाच वर्षांत तालुक्यातील २५ हजार तरुणांना नोकरी मिळवून देईन, असे वचन मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी दिले. 

सुनील शेळके यांनी नाणे मावळातील मुंढावरे, फांगणे, टाकवे खुर्द, शिलाटणे, दहिवली या गावांचा प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला. सर्व गावांमध्ये शेळके यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. वाजत-गाजत मिरवणूक काढून प्रत्येक गावात त्यांचे स्वागत करण्यात आले. शिलाटणे गावातील तरुणांनी सुनीलआण्णांच्या प्रचारार्थ मोटारसायकल रॅली काढली होती.

या प्रचार दौऱ्यात शेळके यांच्या समवेत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती बाळू भानुसघरे,पंचायत समिती सदस्य महादू उघडे, नाणे मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजू देवकर आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेळके म्हणाले की, तालुक्यात तरुण बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तरुणांना रोजगार मिळाला तरच खऱ्या अर्थाने तालुक्यात सुख-समृद्धी येणार आहे. मावळ तालुक्यात तसेच परिसरात अनेक औद्योगिक वसाहती झाल्या आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे कारखाने आहेत. त्यांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे. मावळात व्यावसायिक प्रशिक्षण व तंत्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मावळातील कंपन्यांनी कामगार भरतीमध्ये तालुक्यात राहणाऱ्या तरुणांनाच प्राधान्य द्यावे, यासाठी आग्रही भूमिका घेण्यात येईल. त्याबरोबरच तालुक्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी देखील प्रोत्साहन देण्यात येईल.

तालुक्यातील तरुणांच्या मूलभूत समस्येला हात घातल्याबद्दल गावागावातील तरुणांकडून सुनीलआण्णा यांना विशेष धन्यवाद देण्यात आले. स्वत: उद्योजक असलेल्या शेळके यांनी कोणतेही पद नसताना शेकडो तरुणांना नोकरी दिली आहे. त्यांच्यात दिलेला शब्द पाळण्याची धमक आहे. त्यामुळे यावेळी आम्ही सुनीलआण्णा यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशा भावना अनेक तरुणांनी व्यक्त केल्या.

मुंढवरे येथे शंकर वाघमारे, सदाशिव वाघमारे, नजु वाघमारे, गबाजी वाघमारे, तानाजी वाघमारे, नथु वाघमारे, कैलास वाघमारे, मच्छिंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर पवार, हरीश उंबरकर, शुभम गायकवाड, भावेश थोरात यांनी फांगणे येथे माजी सरपंच संजय गरुड तसेच बजरंग गरुड, सचिन मालुसरे, प्रतीक गरुड, दत्ता मालुसरे, दत्ता वाघमारे यांनी, टाकवे खुर्द गावात माजी सरपंच नवनाथ गायकवाड तसेच बाळू गायकवाड, संपत गरुड, सुनीता गायकवाड, मधुकर गरुड, बाळू ढमाले, एकनाथ गरुड, भाऊ गरुड, सुधीर गरुड, संदीप गरुड, राहुल गरुड, अक्षय देशमुख, चंद्रकात गरुड, शंकर गावडे, तुषार पिंगळे राजू गावडे, संभाजी गरुड, प्रमोद धुमाळ, दत्ता गरुड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सुनीलआण्णा यांचे स्वागत करून त्यांना निवडणुकीसाठी समर्थन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.