Pimpri News : पंतप्रधान आवास योजनेत 2017च्या सर्वेक्षणातील पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य द्या- मीनल यादव

याबाबत यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव उपस्थित होते.

एमपीसीन्यूज : महापालिकेच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातील पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी आणि रावेत येथे इमारत उभारण्याचे काम सुरु झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ह्या अर्जांची सोडत लॉटरी पद्धतीने काढण्यात येणार आहे.

मात्र, या योजनेसाठी सन 2017  मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा नागरिकांकडून अर्ज सादर करण्यात आले होते. तेव्हा सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या नागरिकांना आता पुन्हा अर्ज आणि पाच हजार रुपयांचा डीडी देण्यास सांगण्यात आले आहे.

त्यानुसार संबंधित पात्र लाभार्थी कागदपत्रांसह नागरी सुविधा केंद्रात अर्ज सादर करीत आहेत. हे लाभार्थी तीन वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या योजनेची सोडत काढताना सर्वप्रथम याच लाभार्थ्यांचा विचार करावा.

त्याचरोबर महापालिकेचे विविध प्रक्रल्प आणि रस्ते यासाठी बाधित होऊन बेघर झालेल्या नागरिकांनाही या योजनेत हक्काचे घर मिळवून द्यावे. महापालिकेच्या वेगवेगळ्या आरक्षणासाठी ज्यांना आपले घर गमवावे लागले त्यांच्यासाठीसुद्धा स्वतंत्र कोटा तयार करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर विभागप्रमुख विशाल यादव यांची स्वाक्षरी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.