Pune : जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर; 18 मे रोजी होणार मतदान

एमपीसी न्यूज – जिल्ह्यातील सुमारे 195 ग्रामपंचायतीतील (Pune) 280 सदस्य आणि 10 थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत दाखल करता येतील. 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 मे या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

Pune : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 50 लाख सुवासिक फुलांची आरास 

नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल (Pune). 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.