Alandi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आळंदीमध्ये बैठक संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी येथे आज आळंदी पोलीस स्टेशनच्या (Alandi) वतीने वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शांतता कमिटी यांची बैठक सायंकाळी 7 वाजता पार पडली.

या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी व त्या अगोदर आणि नंतर होत असलेल्या विविध कार्यक्रमाविषयी सिद्धार्थ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. तसेच, त्यांनी वाहतूकी संदर्भातील सूचना मांडल्या. जयंती निमित्त महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. यामुळे महिला पोलीस कॉन्स्टेबल बंदोबस्त वाढवावा. ही मागणी करण्यात आली.

या बैठकीत नगरपालिका अधिकारी कोणीच उपस्थित नसल्याने सिद्धार्थ ग्रुपने नाराजी व्यक्त केली. तसेच, डी डी भोसले पा. यांनी ही पालिका आधिकारी या बैठकीत उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली. आळंदीमध्ये एकोपा असल्याने कोणतेही या उत्सवाला गालबोट लागणार नाही, असे संजय घुंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, डी डी भोसले यांनी यावेळी सांगितले.

Pune : जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर; 18 मे रोजी होणार मतदान

मरकळ येथे 16 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात (Alandi) येणार आहे. असे मरकळ सिद्धार्थ ग्रुपच्या कार्यकर्त्यांने येथे माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यावेळी म्हणाले, मिरवणूक वेळेवर काढावी, वाहतूक संदर्भातील समस्या सोडवल्या जातील. महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येईल. महिलांना कोणी त्रास दिला तसेच दादागिरी केली तर त्याची अजिबात गय केली जाणार नाही.

तसेच, जयंती निमित्त उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस आधिकारी रमेश पाटील, मच्छींद्र शेंडे, जालिंदर जाधव व सिद्धार्थ ग्रुप पदाधिकारी वर्ग, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.