Gujrat News : गुजरातमध्ये वलसाड जिल्ह्यात भीषण स्फोट; इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : गुजरातमधील वलसाड वलसाड जिल्ह्यात सोमवारी रात्री बाराच्या (Gujrat News) सुमारास सरिगाम जीआयडीसीमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले.

वलसाड जिल्ह्यातील सारीगम जीआयडीसी केमिकल झोनमधील व्हॅन पेट्रोकेम फार्मा कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटची तीव्रता एवढी होती की तीन मजली इमारत कोसळली.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्याही सेवेत दाखल झाल्या आहेत. परंतु, फार्मा कंपनी असल्याने रसयानच्या माहिती अभावी अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करता आला नाही.

Chinchwad Bye-Election : मतांच्या त्रिभाजनामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.