Pune – पाणी भरण्याच्या वादातून दीड वर्षीय मुलीला दुसऱ्या मजल्यावरून फेकले

एमपीसी न्युज – पाणी भरण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी मिळून दीड वर्षाच्या चिमुकलीला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना 28 ऑगस्टला हडपसर येथे घडली आहे.

रमेश कुंडलिक (वय 45, रा. हडपसर) व एक महिला यांनी मिळून हे कृत्य केले आहे. याबाबत सुरेश कांबळे (वय 39, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष आणि ते दोघे एकाच बिल्डिंगमध्ये समोरासमोर राहायला असून त्या पाणी भरण्याच्या शुल्लक कारणावरून संतोष आणि रमेश व एक महिला यांच्यात 28 ऑगस्ट ला भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून संतोष यांच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने दुसऱ्या मजल्यावरून त्या दोघांनी मिळून खाली फेकून दिले.

आरोपींना अद्याप अटक झालेली नसून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.