Pune : गणेश मंडळाचा असाही दिलदारपणा ; मंडळाच्या वर्गणीतून वाचवला तरुणाचा जीव

एमपीसी न्यूज – जगभरात प्रसिद्ध असलेला पुण्यातील गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळ्याच गणेश मंडळांची तयारीसाठी लगबग सुरु आहे. बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. यात विशेष बाब म्हणजे पुण्यातील उत्सवात सामाजिक संदेश देणारे अनेक देखावे असतात काही जिवंत तर काही आरास. पण देखावा सादर न करता एखाद्याला जीवनदान देण्याची किमया केली आहे पुण्यातील “नवशक्ती मित्र मंडळाने.

पुण्यातील “नवशक्ती मित्र मंडळ, नवी पेठ पुणे” या मंडळाने एक कौतुकास्पद कामगिरी करून माणुसकी दाखवली आहे. गणपती वर्गणीतून जमवलेल्या पैशातून सतीश जोरी (वय 22) या तरुणाचा त्यांनी जीव वाचवला आहे. सतीशच्या डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने त्याची परिस्थिती खालावली त्याला दवाखान्यात नेण्यात आले. पण त्याची परिस्थिती पाहता कोणत्याही दवाखान्याने त्याला दाखल करण्यास नकार दिला होता.

पण मंडळातील कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी लागणारा खर्च पुण्यातील नवी पेठ येथील नवशक्ती मित्र मंडळाकडून करण्यात आला. एकीकडे गणपतीच्या नावाखाली वायफळ पैसे खर्च करताना पहावयास मिळतात, तर दुसरीकडे अशा कामगिरीतून माणुसकी आजही जिवंत असल्याचे दिसून येत आहे.

मंडळाचे कार्याध्यक्ष किशोज जाधव, अध्यक्ष विजय ठोंबरे, उपाअध्यक्ष रेवन मैद, व्यवस्थापक संतोष ठोंबरे, सुनील कोंढाळकर, अश्विन बामगुडे, जितेंद्र थोरात, नितिन पायगुडे आदी कार्यकर्त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मिरवणूक, देखावे, सजावट यावर होणार खर्च टाळत नवशक्ती मित्र मंडळ यांनी एका तरुणाला दिलेले जीवनदान हा खऱ्या अर्थाने साजरा झालेला उत्सव आहे अस म्हणायला हरकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.