Nigdi : निगडी येथे पहिले सांगितिक वाद्यांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – निगडी येथील डी. आय. सी. ज स्कूलमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये पहिले संगीत व वाद्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शऩात पन्नासहून जास्त सांगितिक वाद्ये पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

या प्रदर्शनाचे उदघाटन तबलावादक रामदास पळसुले यांच्या हस्ते कऱण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना जीवनात संगीत व खेळ यांचे असलेले महत्व सांगितले. प्रदर्शनात संतुर, जलतरंग, मेंडोलीन अशी दुर्मिळ वाद्येही विद्यार्थ्यांना व पालकांना पहायला मिळाली. शाळेच्या विद्यार्थ्यांचा वाद्यवृंदाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकुन घेतली.

विद्यार्थ्यांनी संगीताची नृत्य, योगा, एरोबिक्स, चित्रकला यांची सांगड घालत कलांचेही सादरीकरण केले. शाळेच्या संगीत शिक्षिका अर्पिता जगदाळे यांची प्रदर्शनाची संकल्पना होती. यावेळी डी. आय. सी. चे. सचिव धूपकर सर, मुख्याध्यापिका हर्षा जोशी, उपमुख्याध्यापिका सारिका कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या प्रदर्शऩाचे वैशिष्टय म्हणजे प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण होईल. त्यांचे मानसिक स्वास्थ्य वाढेल, असे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले. सादरीकरणासोबतच म्युझिक थेरपी फॉर रिलॅक्सेशन अॅंण्ड हिलिंग या विषयावरील दृकश्राव्य सादरीकरण हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.