​Hadapsar Fire : मध्यरात्री हॉटेल तिरुमला भवन येथे सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

एमपीसी न्यूज : हडपसरमधील (​Hadapsar Fire) साडेसतरा नळी येथील तिरूमला भवन फुड कॉर्नर मध्ये मंगळवारी (दि.11) मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.
वर्दी मिळताच हडपसर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचले. यावेळी किचनमधील एक स्फोट झालेला सिलेंडर बाहेर काढत इतर सहा सिलेंडर ही सुरक्षित ठिकाणी हलविले व होज पाईपचा वापर करीत पाणी मारुन आगीवर पाचच मिनिटात नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी झाली नाही. किचनमधे गॅस सिलेंडर लिकेज होऊन एका सिलेंडरचा स्फोट झाला व आग लागली असे अग्निशमन दलाने सांगितले. अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचत सहा सिलेंडर तत्परतेने सुरक्षित ठिकाणी हलविल्याने मोठा (​Hadapsar Fire ) अनर्थ टळला. हॉटेलमधील टेबलखुर्चीइलेक्ट्रीक वायरिंग व अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

या कामगिरीत हडपसर अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहन चालक सुखराज दाभाडे, फायरमन गणेश पवळ, बापुसाहेब अढाळगे व मदतनीस अनिकेत तारू, नितेश डगळे यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.