Hadapsar News : हडपसरमध्ये भाजी मंडईमध्ये भीषण आग; 90 स्टॉल्स जळून खाक

एमपीसी न्यूज : हडपसर येथे सोमवारी (Hadapsar News) मध्यरात्री भाजी मंडईमध्ये भीषण आग लागली. यामध्ये जवळपास 90 स्टॉल्स आणि भाजीपाला जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. 

Pune Crime : पाच हजारांची लाच स्विकारताना शिक्षण विभागातील दोन लेखाधिकाऱ्यांना अटक

अग्निशमन दलाकडून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणीही जळून जखमी झालेले (Hadapsar News) नाही.

आगीची वर्दी अग्निशमन दलाकडे येताच काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र, हडपसर व कोंढवा बुद्रुक येथून एकूण तीन अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निदर्शनास आले. जवानांनी तातडीने चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व त्याठिकाणी कोणी इसम नसल्याची खात्री केली. जवानांनी 25 मिनिटात आग पूर्ण आटोक्यात आणत कुलिंग करुन आग पूर्ण विझवत धोका दूर केला.

त्या ठिकाणी छोटे भाजी विक्रीकरिता असणारे अंदाजे 90 स्टॉल असून जवळपास सर्व स्टॉलचे आणि त्यामध्ये असणाऱ्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तिथे असणारे दोन टेम्पोही जळाले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच तांडेल विलास दडस व जवान अनिमिष कोंडगेकर, चंद्रकांत नवले, बाबा चव्हाण, दशरथ माळवदकर, विशाल यादव, प्रकाश शेलार यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.