Hadapsar : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर (Hadapsar) दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सटवाई नगर, मांजरी बुद्रुक येथे घडली. पोलिसानी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक गणेश जगताप (वय 20, रा.मांजरी बुद्रुक) निलेश नामदेव यादव (वय 23, रा. कुंजीर वस्ती, मांजरी बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपींनी पिडीत मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक कृत्य करून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे (Hadapsar) पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे, तपासी अधिकारी सपोनी दाभाडे हे पुढील कारवाई करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.