Pimpri : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर – पिंपरी येथील उभारण्यात (Pimpri) आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

स्थापत्य क्रीडा विभागाच्या चालू असलेल्या कामांच्या स्थळांची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केली. तसेच, इतर कामांची माहिती घेऊन उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. त्यांच्यासमवेत सह शहर अभियंता मनोज शेठिया, कार्यकारी अभियंता हनुमंत शिंदे आदी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर या ठिकाणी भेट देऊन क्रीडांगणामधील लॉन टेनिसचे पूर्ण झालेल्या कामाची माहिती घेतली. त्या ठिकाणी सुरु असलेल्या अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक बाबतची पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करणेबाबत संबंधितांना सूचना केल्या.

Hadapsar : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

त्यानंतर भोसरी सर्व्हे क्रमांक 1 येथील क्रीडांगण संकुल मधील स्टेडियम गॅलरीच्या चालू कामाची पाहणी करून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून विविध खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे. तसेच, कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये ठिकठीकाणी तैलचित्र लावणे अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

कुस्ती प्रशिक्षक अजय लांडगे त्यांचे समवेत होते. खोराटे यांनी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणीसंग्रहालयास भेट दिली. स्वामी (Pimpri) विवेकानंद क्रीडा संकुल, कृष्णानगर येथील लॉन टेनिसच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली. रायफल शूटिंगच्या चालू कामाचीही माहिती माहिती घेऊन हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी संबंधितांना सूचना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.