Talegaon Dabhade : मावळ तालुका कॉंग्रेस आय कमिटीच्या उपाध्यक्ष पदी राजीव फलके

एमपीसी न्यूज – मावळ तालुका कॉंग्रेस आय कमिटीच्या (Talegaon Dabhade) उपाध्यक्षपदी राजीव फलके यांची नियुक्ती करण्यात आली. मावळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी फलके यांना नियुक्तीचे पत्र दिले. फलके यांनी राष्ट्रवादी मधून कॉंग्रेस आय पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी पत्राव्दारे मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्या उपाध्यक्षपदी राजीव फलके यांची नियुक्ती केली. राजीव फलके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षात पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप व आमदार प्रणिती शिंदे यांचे उपस्थितीत नुकताच प्रवेश केला होता.

नियुक्तीचे पत्र देताना तालुका अध्यक्ष यशवंतराव मोहोळ, काँग्रेस आयचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, महिला अध्यक्ष प्रतिमा हिरे, युवक जिल्हाध्यक्ष विशाल वाळुंज, रोहीदास वाळुंज, मिलिंद अच्युत, राजेश वाघोले,खंडू तिकोणे,योगेश पारगे उपस्थित होते.

Pimpri : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार

नियुक्ती नंतर फलके म्हणाले सद्या महाराष्ट्रात तीन चाकी सरकार कार्यान्वित असून पक्षांतर्गत घडामोडी व राजकीय चढाओढ (Talegaon Dabhade) याबाबी सर्वसामान्य नागरिकांना योग्य वाटत नाही. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.