Hadapsar : हडपसर पोलिसांनी वाचवले बेवारस सोडून दिलेल्या नवजात मुलीचे प्राण

एमपीसी न्यूज – हडपसर पोलिसांनी एका चार (Hadapsar) दिवसांच्या नवजात मुलीचे प्राण वाचवले आहेत. संबंधित मुलीला तिच्या पालकांनी बेवारसपणे सोडले होते. हडपसर पोलिस ठाण्यात 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता,दामिनी मार्शल आणि तुकाई मार्शल यांना ससाणे नगरमध्ये आपत्कालीन कॉल आला. सासाणे नगरच्या लेन क्रमांक 13 मध्ये घटनास्थळी आल्यावर दामिनी मार्शल यांना अज्ञात व्यक्तीने सोडून दिलेली चार दिवसांची नवजात मुलगी सापडली.

संबंधित मुलीच्या चेहऱ्यावर मांजराच्या नखाच्या ओरखडे होते. मुल प्रचंड रडत होते. बालरोगतज्ञ डॉ. सचिन सानप यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करत पुढील वैद्यकीय उपचारासाठी मांजरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

SSC-HSC Exam : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

याप्रकरणी मुलीला सोडून देण्यास जबाबदार असलेल्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोलिस हवालदार पवार यांनी शासनाच्या वतीने (Hadapsar) अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 317 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पथक वैशाली उदमले, राजश्री जाधव, मंजुषा डेंगळे, उषा सोनकांबळे, दर्शन पवार यांच्यासह डॉ बजरंग धायगुडे यांनी पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.