Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘एसएफआय’ आणि ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

एमपीसी न्यूज :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune) स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात  SFI आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच अभाविप या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये दोन्ही संघटनाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. 

विद्यापीठातील भोजनगृहासमोर एसएफआयची सदस्यता नोंदणी सुरु होती. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना जाब विचारला असता यावेळी बाचाबाची होऊन थेट हाणामारी पर्यंत हा प्रकार घडला.

Hadapsar : हडपसर पोलिसांनी वाचवले बेवारस सोडून दिलेल्या नवजात मुलीचे प्राण

दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारले. यावेळी दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (Pune) नोंदवण्यासाठी गेले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.