Maratha Reservation : मावळचे आमदार सुनील शेळके यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – मंत्रालया बाहेर आंदोलन केल्याप्रकरणी ( Maratha Reservation) पोलिसांनी सर्वपक्षीय आमदारांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांचाही समावेश आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 1) मुंबई येथे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली.

सर्वपक्षीय बैठक सुरू असताना विविध पक्षातील आमदारांनी मंत्रालयाबाहेर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. आमदारांचे हे आंदोलन मंगळवार (दि. 31) पासून सुरू आहे. मंगळवारी आंदोलनात 10 आमदार होते. बुधवारी 25 आमदारांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Hadapsar : हडपसर पोलिसांनी वाचवले बेवारस सोडून दिलेल्या नवजात मुलीचे प्राण

या आंदोलनात मावळचे आमदार सुनील शेळके चांगलेच आक्रमक झाले. मराठा आरक्षण देण्याच्या मागणीवरून त्यांनी घोषणा दिल्या. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या आमदारांना समजावण्याचा काही मंत्र्यांनी प्रयत्न केला.

मात्र ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आमदारांनी आपली भूमिका आक्रमक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतले.

पोलीस आमदारांना ताब्यात घेत असताना आमदार सुनील शेळके यांनी ‘तुम्ही मला आज ताब्यात घ्याल. पण उद्या पुन्हा इथे येऊन बसू’ असा आक्रमक पवित्रा ( Maratha Reservation) घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.