Maratha Reservation : पिंपरी चिंचवड शहरातील आमदार, खासदारांनी चोवीस तासात भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा…

मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

एमपीसी न्यूज – आरक्षणासाठी मराठा समाज (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे. पिंपरी- चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मराठा समाज साखळी उपोषणासह विविध आंदोलन करत आहे. परंतु, याबाबत शहरातील आमदार महेश लांडगे, आण्णा बनसोडे, अश्विनी जगताप व उमा खापरे तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. या सर्वांनी येत्या चोवीस तासात भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा झोपेत असलेल्या आमदार, खासदार यांना जागे करण्यासाठी लवकरच शहरातील मराठा समाज तुमच्या भेटीला येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

पिंपरीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आमदार खासदार यांच्या (Maratha Reservation) विषयी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.

या बैठकीस सतिश काळे, प्रकाश जाधव, मारूती भापकर, धनाजी येळकर पाटील, नकुल भोईर, वैभव जाधव, मीरा कदम, सुनिता शिंदे, कल्पना गिडडे, नानासाहेब वारे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Maratha Reservation : मावळचे आमदार सुनील शेळके यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषण करत आहेत. सरकारचा निषेध (Pimpri-Chinchwad) करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (गुरुवारी) निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.

मोर्चा सकाळी 11 वजता खंडोबा मंदीर चौक, आकुर्डी येथून तहसलिदार कार्यालय निगडी असा निघणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.