Katraj : मारहाण प्रकरणावरून तृतीयपंथीयांचा कात्रज पोलीस ठाण्यात गोंधळ, पोलिसांनाही धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – एका तरुणाने मारहाण (Katraj) केल्याच्या रागातून काही तृतीयपंथीयांनी कात्रज पोलिस चौकीत रात्री गोंधळ घालत पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी तरुणाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा खून करतो अशी थेट पोलिसांसमोरच धमकी तृतीयपंथीयांनी दिली होती.

याबाबत पोलिस कर्मचारी केतन विष्णू लोखंडे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहित पवार (वय 26), सूरज कांबळे (वय 19), अजय अहिवळे (वय 24), राणी पाटील (वय 26), मयूर राऊत (वय 24, सर्व रा. खोपडेनगर), अल्फीया उर्फ लंगडी, खुशबू, आकाश यांच्यासह दहा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकात काही तृतीयपंथीय वाहनचालकांकडून पैसे गोळा करत होते. त्यावेळी सनी नावाच्या एका तरुणाने त्रास देत मारहाण केल्याची तक्रार तृतीयपंथीयांनी दिली होती.

Maratha Reservation : पिंपरी चिंचवड शहरातील आमदार, खासदारांनी चोवीस तासात भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा…

पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेत कात्रज पोलिस चौकीत आणले. त्यावेळी तृतीयपंथीय पोलिस चौकीत आले. त्यांनी सनीला ताब्यात देण्याची मागणी केली.

‘आम्ही त्याचा खून करणार आहोत,’ असे म्हणत पोलिस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तृतीयपंथीयांनी रागाच्या (Katraj) भरात टेबलवरील रजिस्टर आणि कागदपत्रे फेकून दिली.

पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तृतीयपंथीय सनीकडे जात होते. पोलिसांनी त्यांना प्रतिकार केला असता तृतीयपंथीयांनी पोलिस कर्मचारी लोखंडे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत ढकलून दिले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.