Pune : …पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा – डी. एस. कुलकर्णी

डी. एस. कुलकर्णी जामीन मिळवून पाच वर्षांनंतर तुरुंगाबाहेर

एमपीसी न्यूज – गुंतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक करण्याचा ( Pune )  आरोप असलेल्या डी. एस. कुलकर्णींची जामिनावर सुटका झाली आहे. नऊ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात पाच वर्षांनंतर जामीन मिळवून ते तुरुंगातून बाहेर आले आहेत.

फेब्रुवारी 2018 मध्ये गुंतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी डी . एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक करण्यात आली होती. आज ते याच  खटल्याबाबत पुणे न्यायालयात आले होते.

Hadapsar : हडपसर पोलिसांनी वाचवले बेवारस सोडून दिलेल्या नवजात मुलीचे प्राण

ज्या कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती, त्या कायद्यानुसार जास्तीत  ( Pune ) जास्त किती दिवस या आरोपींना न्यायालयात ठेवता येतं? हा निकष न्यायालयाने पाहिला. नेमून दिलेल्या काळापेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.

यावेळी पुणे न्यायालयातूम डी. एस. कुलकर्णी  बाहेर जाताना माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला .पण त्यांनी  फार काही न बोलता  “मोडून पडला  संसार तरी मोडला नाही कणा…पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा” अशा कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त ( Pune ) केल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.