SSC-HSC Exam : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – 2024 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या  (SSC-HSC Exam ) वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून आज जाहीर करण्यात आले आहे.

इयत्ता बारावी परीक्षा वेळापत्रक

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इ.12 वी) बुधवार दि. 21 फेब्रुवारी पासून मंगळवार दि.19 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण, द्विलक्षी अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपन्न होणार आहेत.

तथापि, इयत्ता बारावीच्या माहिती व सामन्य ज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. 20 मार्च ते दि. 23 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहेत. तसेच इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत.

इयत्ता दहावी परीक्षा वेळापत्रक

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) शुक्रवार दि.1 मार्च 2024 पासून मंगळवार दि.26 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहेत. इयत्ता 10 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी,तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि.10 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 (SSC-HSC Exam ) या कालावधीत होणार आहेत.

Talawade : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची विष पिऊन आत्महत्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in अधिकृत संकेतस्थळावर उद्या दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तथापि, या संकेतस्थळावरील वेळापत्रक हे माहितीसाठी देण्यात आले. असून याबाबत छापील अंतिम वेळापत्रक सर्व संबंधित शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इतर कोणत्याही संस्था अथवा संकेतस्थळावरीळ वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन देखील शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.