Vadgaon Maval : वडगावात 480 महिलांच्या सहभागाने खेळ रंगला पैठणीचा

एमपीसी न्यूज – जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ यांच्या (Vadgaon Maval) संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नितीन कोकणे प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात 480 महिला सहभागी झाल्या. विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
महिला या नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनिसाठी व्हावेत म्हणून नवरात्रोत्सवात जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नितीन कोकणे प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Vadgaon Maval) लाभला. खेळ रंगला पैठणीचा या कार्यकमात सुमारे 480 महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
पहिले बक्षीस – (मानाची पैठणी) प्रतिभा विगे
दुसरे बक्षीस -(सोन्याची नथ) चारुशीला पडगे
तिसरे बक्षीस – (चांदीचा छल्ला) अनिता नरड
कोरोना कालावधीत अनेक सणवार उत्सवांवर निर्बंध असल्यामुळे यंदाच्या वर्षी या नवरात्रोत्सवामध्ये महिलांनी दांडिया व रासगरबा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, डान्स स्पर्धा, लकी ड्रॉ स्पर्धेत एकूण 1800 स्पर्धकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी नवरात्रोत्सवात आरतीसाठी वडगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. मंडळास सदिच्छा भेट देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांत अध्यक्ष जंयत पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार सुनिल शेळके, आमदार शहाजीबापू पाटील आदी मान्यवर यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे नियोजन जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.