Vadgaon Maval : खेळ खेळूया गंमतीचे कार्यक्रमाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज  – माळीनगर, वडगाव मावळ (Vadgaon Maval) येथील नगरसेवक किरण रघुनाथ म्हाळसकर व माळीनगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या खेळ खेळूया गंमतीच्या कार्यक्रमात अनिता संदिप कल्हाटकर पहिल्या एलएडी टिव्ही विजेत्या ठरल्या, दुसरा नंबर माधुरी मोरे, तिसरा नंबर हिना गुप्ता तर लकी ड्रॅा विजेत्या वैशाली म्हाळसकर ठरल्या.
या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग घेऊन खेळांचा आनंद लुटला. यावेळी नगरसेविका अर्चना म्हाळसकर, सुनिता भिलारे, नगरसेवक श्रीधर चव्हाण, उद्योजक सुनिल येवले, किरण भिलारे, नामदेव वारींगे, कल्पेश भोंडवे, रविंद्र म्हाळसकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन स्नेहल औटी, सीमा ढोरे, रोहिनी पवार, निलम म्हाळसकर, दिपाली सुतार, किरण आगळे, ज्योती शिंदे, निलम दिवाडकर यांनी केले. सुत्रसंचालन नीता चोरडीया (Vadgaon Maval) यांनी केले तर आभार सपना म्हाळसकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.