NIMA : निमा पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी डॉ. प्रताप सोमवंशी यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – निमाची (NIMA) 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा काल ग्रँट एक्झॉटिका हॉटेलमध्ये पार पडली. नूतन कार्यकारिणी 2022-24 या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष डॉ. प्रताप सोमवंशी, सचिव डॉ. रमेश केदार, कोषाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब वाघमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर निमा वुमन्स फोरमच्या पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. तसेच, डॉ. संतोष भांडवलकर, डॉ. किशोर महाजन, डॉ. अभय तांबिले, डॉ. धनंजय पाटील, डॉ. अमृत पेरणे, डॉ. नीलेश वाघमारे, डॉ. सुनील भोये, डॉ. सुशील सिंघवी, डॉ. प्रशांत बंब, डॉ. प्रसाद काटे, डॉ. अभिजीत आग्रे, डॉ. नीलेश लोंढे, डॉ. सुभाष निकम, वीस टक्के महिला आरक्षण म्हणजे चार महिला प्रतिनिधी डॉ. अर्चना शिंदे, डॉ. सारिका भोईर, डॉ. अंजली आवटे, डॉ शिल्पा स्वार यांचीही नूतन कार्यकारिणीत महिला सदस्य म्हणून निवड झाली.

अध्यक्षा डॉ.जबीन पठाण, सचिव डॉ. प्रतिभा लबडे, कोशाध्यक्ष डॉ. संगीता गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. मयूरी मोरे, डॉ. हेमा चंद्रशेखर, सहसचिव डॉ. रोहिणी बऱ्हाणपुरे-ठाकूर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Vadgaon Maval : खेळ खेळूया गंमतीचे कार्यक्रमाला प्रतिसाद

निमा वुमन्स फोरमची नूतन कार्यकारिणी (NIMA) याप्रमाणे डॉ. स्मिता पाटील, डॉ. आदिती तांबिले, डॉ. अर्चना घाडगे, डॉ. सायली वळसंगकर, डॉ. चंचला केदार, डॉ. ज्ञानेशा देसाई, डॉ. स्नेहल लांडगे, डॉ. स्वप्ना डांग माळी, डॉ. सोनाली काटे, डॉ. लता जानगुडे, डॉ. शीतल राऊत, डॉ. सारिका लोंढे, डॉ. मृणाल कुंडले या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली.

नूतन अध्यक्ष डॉ. प्रताप सोमवंशी यांनी आयुर्वेदाची नॅशनल कॉन्फरन्स, निमा भवन इंटिग्रेटेड प्रॅक्टिस करणार. या डॉक्टरांच्या कायदे व शासनाच्या अमेंडमेंट याचे बुकलेट प्रकाशित करण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असे याप्रसंगी उद्गगार काढले. ज्येष्ठ सदस्य डॉ. प्रमोद कुबडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम अतिशय चोख पार पाडले.

मावळते अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव डॉ. अभय तांबिले व खजिनदार डॉ. सुनील पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.