Chakan Murder Case : कोयत्याने सपासप वार करुन तरुणाचा खून

एमपीसी न्यूज : चाकण – रोहकल (Chakan Murder Case) रस्त्यावर 2 लोखंडी कोयत्यांनी डोक्यावर, मानेवर, हातावर सपासप वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. 10 ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटना स्थळावरून रक्ताने माखलेले 2 कोयते हस्तगत केले आहेत. पूर्ववैमनस्यातून अत्यंत नियोजनपूर्वक ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलीसांनी वर्तवला आहे.

युसुफ अर्षद काकर (वय १९, रा. खंडोबा माळ, चाकण, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.   पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, युसुफ हा युवक आपली रिक्षा घेऊन चाकण रोहकल रस्त्याने जात होता. दुपारी रोहकल येथे ‘राम लक्ष्मण झुरी’ भागात आल्यानंतर चाकणच्या बैलगाडा घाटाच्या समोर आधीच दबा धरून बसलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी काकर याची रिक्षा अडवली. याच गोंधळात ही रिक्षा रस्त्यालगतच्या चारीत गेली. काकर रिक्षा सोडून पळत सुटला. चार ते पाच हल्लेखोरांनी काही अंतर पाठलाग करुन काकर यास गाठून डोक्यावर, मानेवर, हातावर सपासप अनेक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युसुफ याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळावरून पोलीसांनी दोन रक्ताने माखलेले कोयते हस्तगत केले आहेत.

मागील वर्षी चाकण मार्केट समोरील (Chakan Murder Case) पीडब्ल्यूडीच्या मोकळ्या जागेत एक हत्या झाली होती. त्यात युसुफ काकर हा संशयित होता. मागील हत्येच्या कारणावरून हा खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळावरून पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार युसुफ याच्या रिक्षात प्रवाशी म्हणून बसलेला युवक देखील हल्लेखोरांचा साथीदार होता. घटनास्थळी आल्यानंतर त्यानेच प्रथम हल्ला केला. त्याबाबत एका मोटारीतून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले. युसुफ याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर दोन कोयते घटनास्थळीच टाकून सर्वजण पसार झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चप्पल, एक बॅग, दोन कोयते आणि रिक्षातून मिरची पूड, टोकदार वस्तू हस्तगत केली आहे.

​Hadapsar Fire : मध्यरात्री हॉटेल तिरुमला भवन येथे सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

पोलीसांनी संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. यात नेमके आरोपी कोण होते याबाबत पोलीस शोध घेत आहेत. काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.